विरार, वाणगाव, जव्हारमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार

By Admin | Updated: August 30, 2016 02:27 IST2016-08-30T02:27:20+5:302016-08-30T02:27:20+5:30

विरार , वाणगाव आणि जव्हार येथे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी तीनही गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे.

Rape in marriage, marriage, marriage, marriage in Jawhar | विरार, वाणगाव, जव्हारमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार

विरार, वाणगाव, जव्हारमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार

विरार : विरार , वाणगाव आणि जव्हार येथे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तीन गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी तीनही गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे.
विरारमधील एका तरुणीशी फेसबुकवर मैत्री करून निर्मळ येथे राहणाऱ्या आॅस्टीन गोम्सने तिला लग्नाचे आमिष दाखवून भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तरुणीवर बलात्कार केला होता. यावेळी त्याने तरूणीचे अश्लिल फोटो काढले होते. त्या आधारे आॅस्टीनने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आॅस्टीनला अटक केली.
डहाणू वाणगावमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर समीर शेळके या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. समीरने या तरुणीला २०१५ मध्ये नवरात्रीमध्ये लग्नाची मागणी घालून तिच्याशी शरीर संबध ठेवले. त्यानंतर आॅगस्ट २०१६ पर्यंत पालघर अनेक लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्या तरुणींनी लग्नासाठी तगादा लावल्यानंतर समीरने तिच्याशी भेटणेच बंद केले होते. आपली फसवणूक झाल्याने तिने वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीरला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Rape in marriage, marriage, marriage, marriage in Jawhar