खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार

By Admin | Updated: May 20, 2016 02:06 IST2016-05-20T02:06:42+5:302016-05-20T02:06:42+5:30

खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला.

Rape of the girl by showing lacquered food | खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार

खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार


बारामती : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला. आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गुटकडे (वय २१, मूळ रा. वाणेवाडी, जि. उस्मानाबाद, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, आरोपीला न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारे या बालिकेचे कुटुंब गेल्या सहा महिन्यांपासून शेतमजूर म्हणून काम करतात. बारामती तालुक्यातच ते काम करीत आहेत. घटनेतील आरोपी हाही उस्मानाबाद जिल्ह्यातीलच आहे. आरोपी चालवत असलेल्या टेम्पोतून शेतमजूर महिलांची ने-आण त्याच्याकडून केली जाते. बुधवारी (दि. १८) देखील या महिला सोनगाव येथीलच एका शेतकऱ्याच्या शेतात खुरपणीसाठी गेल्या होत्या.
या वेळी बालिकाही तिच्या आईसमवेत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपीने पीडित बालिकेला खाऊचे आमिष दाखविले. तसेच पाठीवर बसवून लगतच्या उसाच्या पिकात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर बालिकेने रडत येऊन तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला स्थानिक ग्रामस्थांनी शेतातच पकडले. त्यानंतर आरोपीला ग्रामस्थांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी रात्री या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. तर, आरोपी गुटकडे यास रात्री उशिरा अटक केली.

Web Title: Rape of the girl by showing lacquered food