शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घ्यावी; रावसाहेब दानवेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:52 IST

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजपा चालत नाही असा टोला दानवेंनी लगावला.

मुंबई - उद्धव ठाकरेंना आरोप करायचे असतील तर लोकांसमोर जावं, जाहीर भाषण करून करावे. संजय राऊतांना मुलाखत द्यायची असेल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपाशी जो दगाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. 

रावसाहेब दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात मग २०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला ते दिसलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिलं सांगता पण स्वत:चा सार्थ साधत दिलेला शब्द पाळला नाही. सध्या उद्धव ठाकरे नैराश्य झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे असाही खोचक टीका दानवेंनी केली. 

तसेच पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजपा चालत नाही. बिहारमध्ये भाजपाची संख्या जास्त असतानाही आम्ही मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना दिले. तेच धोरण महाराष्ट्रात राबवलं. आम्ही कुठला निर्णय घ्यावा हे आम्हाला सांगू नये. तुम्ही दोघं कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुलाखत फडणवीस-राज आणि शिंदेंची या सगळ्यांची घ्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना विचारावी असंही रावसाहेब दानवे म्हणाले. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले.  काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

तसेच मला चिंता आहे ती मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे. याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्यांच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे असंही ते म्हणाले. त्याचसोबत शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वासाठी राजकारण केले, ते हिंदुत्व मजबूत व्हायला हवे म्हणून! पण हे राजकारणासाठी हिंदुत्व वापरतायत. हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे. शिवसेनेचे राजकारण हे आम्ही हिंदुत्व मजबूत होण्यासाठी केले. पण त्यांचे राजकारण मजबूत करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व वापरले असा आरोप ठाकरेंनी भाजपावर केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेraosaheb danveरावसाहेब दानवेShiv Senaशिवसेना