रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते!

By Admin | Updated: February 8, 2015 01:31 IST2015-02-08T01:31:10+5:302015-02-08T01:31:10+5:30

रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

Raosaheb Danave was going to Congress! | रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते!

रावसाहेब दानवे काँग्रेसमध्ये येणार होते!

नागपूर : रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

सोमवारी रास्ता रोको
शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्यांत झालेली वाढ, मुंबई शहराचे महत्त्व कमी करून गुजरातकडेच विशेष लक्ष आदी प्रश्नांवर भाजपा-शिवसेना युती सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
दानवे यांचे प्रतिआव्हान
काँग्रेस बुडते जहाज असल्याने आपण तेथे जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असे सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असे प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिले.

Web Title: Raosaheb Danave was going to Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.