रंजल्यागांजल्या जिवांचा कनवाळू.!
By Admin | Updated: November 12, 2014 01:35 IST2014-11-12T01:35:10+5:302014-11-12T01:35:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील पिंपळाच्या झाडाचा परिसर.़़ एक व्यक्ती आली आणि त्याने झाडाझुडपांतून झाडण्यास सुरुवात केली..

रंजल्यागांजल्या जिवांचा कनवाळू.!
औरंगाबाद : वेळ सकाळी 9 वाजेची.़़ स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयासमोरील पिंपळाच्या झाडाचा परिसर.़़ एक व्यक्ती आली आणि त्याने झाडाझुडपांतून झाडण्यास सुरुवात केली.. पाणी शिंपडले.. सिमेंटच्या भांडय़ात स्वच्छ पाणी भरले.. पिशवीतून पोळी, भाकरी काढून कुस्करून खाली पसरविली.़़ मोबाइलमधील तंबो:याची धून सुरू केली आणि राग आळवण्यास सुरुवात केली.. अन् क्षणार्धात झाडावरून खाली उतरून खारूताई, चिमणी, कावळे, पारवा यांनी मनसोक्तपणो या अन्नावर ताव मारला. पेन्शनच्या रकमेतून प्राणिमात्रंच्या पोटाची व्यवस्था पाहणारा हा जगावेगळा प्राणिमित्र म्हणावा लागेल़ मनोहर उबाळे असे या प्राणिमित्रचे नाव आहे.
1972पासून हे कार्य सुरू आहे. 43 वर्षापूर्वी मिलिंद कला महाविद्यालयात शिपाई म्हणून रुजू झालेले उबाळे 2क्1क्मध्ये अधीक्षकपदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही त्यांची दिनचर्या बदलली नाही. पैठणगेट परिसरातील घरातून ते सकाळी 8 वाजता निघतात. रस्त्यात बसलेल्या भिकारी, आजारी व्यक्तीला पोळी-भाजी व बिस्कीटचा पुडा वाटप करीत ते विद्यापीठच्या दिशेने जातात. हॉस्टेलवरील आर्थिकदृष्टय़ा गरीब विद्याथ्र्याना विविध शिक्षणोपयोगी साहित्य ते देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात सकाळच्या वेळी पक्षी चातकाप्रमाणो त्यांची प्रतीक्षा करतात़ त्यांची येण्याची चाहूल लागली की, पक्षी किलकिलाट करतात. खारूताई झाडावरून खाली उतरते आणि बघता-बघता पक्ष्यांची आणि उबाळे यांची मैफल सुरू होते.
प्रत्येक जिवात ईश्वर असून, प्राणिमात्रंची सेवा म्हणजे ईश्वराचीच सेवा होय़ पत्नी शोभा उबाळे हिच्या आधारामुळेच माझा हा नित्यक्रम सुरू आह़े यासाठी माङो उर्वरित आयुष्यही त्यांच्या सेवेतच व्यतीत करणार आहे, असे मनोहर उबाळे यांनी सांगितले.