शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव, कुरुंदवाडमध्येही तरुणाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 17:18 IST

Rangpanchmi Kolhapur-रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे.

ठळक मुद्देरंगपंचमीने घेतला तीन बालकांचा जीव कोल्हापूर जिल्ह्यातील घटना : पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू

कोल्हापूर : रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. तिघाही मुलांना पोहता येत नव्हते. दरम्यान, कुरुंदवाडमध्येही विहीरीत पोहण्यास गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामुळे मृतांची संख्या एकूण चार झाली आहे. शिंगणापूर (ता.करवीर) येथील यशराज राजू माळी (वय १६ ) याचा गावातील खाणीत बुडून मृत्यू झाला. माळी कुटुंबिय मुळचे सातारा जिल्ह्यातील आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून त्याला लहानाचा मोठा केला. सध्या तो दहावीत शिकत होता. सकाळी उठून मित्रासोबत रंगपंचमी साजरी केली. त्यानंतर तो आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला. त्याला पोहायला येत नव्हते. खाणीत उडी मारल्यावर ती कडेला पडल्याने तो गाळात रुतला व त्याकडे कुणाचे लक्ष न गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.कोडोली (ता.पन्हाळा) येथील दोघे मुले विहिरीत बुडाल्याची भिती व्यक्त होत आहे. शिवराज कृष्णा साळोखे (वय १४ ) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १४ रा. दोघेही कोडोली, ता.पन्हाळा) अशी त्यांची नांवे आहेत. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पाच-सहा मित्रांसोबत अकराच्या सुमारास ती वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेली होती. कपडे विहिरीच्या काठावर काढून ते कठड्यावरच बसले होते. परंतू त्यांचा तोल जावून ते विहिरीत कोसळले. या दोघांनाही पोहता येत नव्हते.

हे दोघे बुडाल्याचे पाहून अन्य शुभम पाथरवटचा भाऊ भितीने ओरडत गावात पळत आला.. त्यानंतर ग्रामस्थांनी शोध मोहिम राबवली परंतू दुपारपर्यंत ती मिळून आली नव्हती. अजूनही त्यांची शोध मोहिम सुरु आहे. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडिल शेतकरी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. शुभमची आई शिलाई मशिन चालवत त्याचे संगोपन करत होती. सामान्य गरिब कुटुंबातील या दोघांच्या मृत्यूने गावांवर शोककळा पसरली.

टॅग्स :HoliहोळीAccidentअपघातkolhapurकोल्हापूर