रणरागिणींनी उधळला चोरट्यांचा डाव
By Admin | Updated: October 25, 2016 18:19 IST2016-10-25T17:46:43+5:302016-10-25T18:19:03+5:30
लूटमार करण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांच्या टोळक्यांचा डाव दोन महिलांनी उधळल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस

रणरागिणींनी उधळला चोरट्यांचा डाव
>पंकज पाटील/ ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 25- लूटमार करण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांच्या टोळक्यांचा डाव दोन महिलांनी उधळल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. महाराष्ट्र बँके लगतच्या कॅनाल रोड चोकात सोमवारी रात्री आठ वाजेच्या सूमारास एका दूचाकीस्वाराला धक्का देऊन त्याला लोखंडी रॉडने मारहाण करत त्याच्या कडे असलेली पैशांची बॅग व मोबाईल लूटमार करण्याचा बेतात असलेल्या पाच जणांच्या टोळक्यांची घटनास्थळी असलेल्या दोन महीलांनी रणरागीणीचा अवतार धारण करून पळता भुई थोडी केली . तसेच या दोघींमुळे टोळक्याच्या हल्यातून के आर ट्रेडर्सचे कर्मचारी अरूण कूमार यांचे प्राण वाचले आणि कलेक्शन केलेली रोख 22 हजार 300 व मोबाईल लूटण्याचा चोरट्यांचा डाव फसला. कॅनॉल रोड झोपडपट्टीतील राहणाऱ्या राधीका दाहीजे व सूनिता पगारे या दोन्ही रणरागीणींनी दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे .