शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

रामटेक-तुमसर रेल्वे मार्ग सर्वेक्षणाला हिरवी झेंडी

By admin | Published: September 06, 2016 4:32 AM

स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली

मोहन भोयर,

तुमसर (भंडारा)- स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली आहे. यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रेल्वे मार्ग तिरोडी-कटंगी-बालाघाट मार्गाला जोडण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी तुमसर रोड ते तिरोडी दरम्यान रेल्वे ट्रॅक घातले होते. मँगनिज धातूची ने-आण करण्याकरिता त्यांनी हा ट्रॅक घातला होता. आजही या ट्रॅकवरून मँगनीजसह प्रवासी गाड्या धावतात. मध्यप्रदेशातील तिरोडीपर्यंतच हा रेल्वे मार्ग आहे. लवकरच सर्वेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती रेल्वे सूत्राने दिली.एका आठवड्यापूर्वी नागपूर विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक अजित अग्रवाल यांनी निरीक्षण दौरा केला. मॉईलकडून दरवर्षी रेल्वेला मोठा महसूल प्राप्त होतो. तुमसर रोड-तिरोडी हा एकेरी रेल्वे मार्ग आहे. घनदाट जंगलातून हा मार्ग जातो. रामटेक-तुमसर टाऊन नवीन रेल्वे मार्ग तयार होण्यापूर्वी हा रेल्वे मार्ग दुहेरी करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. रामटेक-गोंदिया राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याकरिता हालचाली सुरू असून चौपदरीकरणाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.हा मार्ग तयार झाल्यावर या परिसराचा कायापालट होण्यास मोठी मदत होईल. तुमसर टाऊन येथे मोठे रेल्वेस्थानक तयार करण्याचा रेल्वेचा मानस आहे.>आता तुमसर टाऊन-तिरोडी रेल्वे मार्गाला अच्छे दिन प्राप्त होतील. हा रेल्वे मार्ग तयार करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.-के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य तथा सदस्य, रेल्वेस्थानक सल्लागार समिती देव्हाडी.