सातारा : एक आमदार आणि दोन खासदार एक तिसऱ्या टर्मचे खासदार. ते म्हणाले की मी स्वयंघोषित भगिरथ आहे. माझे म्हणणे आहे की ते स्वयंघोषित छत्रपती आहेत. त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या चिखल्या-टकल्या काढणे योग्य नाही. तुमचाही कधी राज्याभिषेक झाला नाही. तो घरघुतीच होतो. माझाही झाला तोही वाड्यातच झाला. तेव्हा कोणीही भगिरथ कोणाला स्वयंघोषित म्हणत नाही, असे सांगत रामराजे निंबाळकरांनी खासदार उदयनराजेंना खंडाळ्याच्या घाटात जाण्याचे आव्हान दिले आहे.
आपले डोळे उघडे असतील, वेळ असेल आणि मन स्थिर असेल तर खंडाळ्याच्या पलीकडे एक खिंड लागते. तेथे पलीकडे आणि घाटाच्या अलीकडे तुमची दीड कोटीची लँड क्रूझर डावीकडे वळवून कालव्यावरून आंद्रुलपर्यंत प्रवास करावा. मग त्या भागातील गावाला नीरा देवधरच्या कृष्णेचे पाणी मिळू शकत नव्हते त्या गावाला 10-15 बोगदे पाडून पाणी दिले ते पाहावे. ते लोक जर भगिरथ म्हणत असतील आणि जर गेली 15 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरत असलो तर आपल्याया दुख का व्हावे, तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता, तेव्हा काय केले असा प्रश्न रामराजे यांनी विचारला.
स्वत:ला छत्रपती म्हणत फिरता आणि कुळातील लोकांची नावे खाली घालून त्यांच्याकडून ना हरकतसाठी पैसे उकळण्याचे धंदे केल्याचा टोला त्यांनी उदयनराजेंना लगावला. फलटनमध्ये येऊन आम्हाला बांडगुळ म्हणता, पण याच बांडगुळांनी तुमच्या आधीची पीढी सांभाळली हे तरी आठवा, असे सांगत जयकुमार गोरे, रणजित नाईकनिंबाळकर आणि उदयनराजे हे यापूर्वी एकत्र होते. साताऱ्याच्या प्रकरणात सर्व आमदारांना उरावर घेतले. एकाला डाव्या काखेत आणि दुसऱ्याला उजव्या काखेत घेऊन फिरणार आहे, असा इशारा रामराजेंनी दिला.
शरद पवारांना स्पष्ट शब्दांत सांगणारउद्या राष्ट्रवादीची जिल्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये शरद पवार यांना तुमचा खासदार सांभाळायचा असेल तर कंट्रोलमध्ये ठेवा अन्यथा आम्हाला बाहेर पडायची परवानगी द्यावी, असे स्पष्ट शब्दांत सांगणार असल्याचे रामराजे यांनी सांगितले.