शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Bhaskar Jadhav : मुंबईतील शौचालयांत जेवढी घाण नाही, त्याहून अधिक रामदास कदमांनी ओकली, भास्कर जाधवांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 14:59 IST

"मी एवढंच सांगेल, की मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते. त्या जनतेसाठी मुंबईत शौचालयाची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण शौचालयाची जेवढी घाण नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे."

 काल रामदास कदमांनी जी सभा घेतली ती संपूर्ण राजकीय वैचारिक बैठकीला छेद देणारी सभा आहे. रामदास कदमांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली आहे, तशी आजवर कुणीही वापरलेली नाही. यामुळे, रामदास कदमांनी जी भाषा वापरली, आज हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल, तस-तशी महाराष्ट्रातील जनता विशेषतः महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पुजा करतील. एवढेच नाही, तर रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेल, की मुंबईत एक कोटी तीस लाख जनता राहते. त्या जनतेसाठी मुंबईत शौचालयाची व्यवस्था आहे. त्या संपूर्ण शौचालयाची जेवढी घाण नाही. तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली आहे, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.

"रामदास कदमांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात जे विधान केले, ज्यासंदर्भात मी कॅमेऱ्यासमोर तर नाहीच, पण खासगीतही उल्लेख करणार नाही. त्यामुळे हे विधान जेव्हा महाराष्ट्रातील जनतेसमोर जाईल, तेव्हा रामदास कदमांची जोड्याने पुजा होईल. मी पुन्हा बोलतो, की मुंबईतील शौचालयात जेवढी घाण नाही, त्याहूनही अधिक घाण काल रामदास कदमाने आपल्या तोंडातून ओकलेली आहे," असे भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले आहे.

"मी कधीही कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. रत्नागिरीतील सभा आणि दापोलीत केलेले वक्तव्य, यांत मी वैयक्तीक टीका केलेली नाही. उदय सामंत काय बोलले आणि रामदास कदम मला काय बोलले. हे गेल्या कित्तेयक वर्षांपासून माझ्या मनात होते. योग्यवेळ आल्यानंतर नंतर त्यांचेच शब्द मी त्यांच्या तोंडात घातले आहेत. याचाच अर्थ, त्यांनी ज्या तोंडाने घाण ओकली, तीच घाण मी त्यांच्या तोंडात घातली आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर कुठलीही टीका केलेली नाही," असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम - तत्पूर्वी, शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. "मी उद्धव ठाकरेंना सांगेन की शिवसेना तुम्ही नाही उभी केली. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?" असे रामदास कदम यांनी म्हटले होते.

सोनियांच्या नादी लागू नका"शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील", असेही रामदास कदम यांनी म्हटले होते.

 

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे