शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

१००% वाट लागली! रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपने शिवसेनेत 'वादळ', सोमय्यांना दिले अनिल परबांविरोधातील पुरावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 5:08 PM

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमय्यांनी गेल्या काही महिन्यांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले आहेत. यामागे शिवसेनेच्याच बड्या नेत्याचा हात असल्याचा आरोप आता राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. (ShivSena Leader Ramdas Kadam gave information about Anil Parab resort to Kirit Somaiya)

एक माहिती अधिकार कार्यकर्ता परब यांच्याविरोधात किरीट सोमय्यांना सगळी माहिती पुरवतो, कारवाईसाठी पाठपुरावा करतो आणि मग हाच कार्यकर्ता सगळ्या अपडेट्स शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांना पुरवतो, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. संजय कदम यांचे आरोप रामदास कदम यांनी फेटाळले आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?ऑडिओ क्लिपमध्ये प्रसाद कर्वे आणि किरीट सोमय्यांचा संवाद आहे. अनिल परब यांचं वांद्र्यातलं कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात येणार आहे. न्यायालयानं तसे आदेश दिलेत, असा दोघांमधला संवाद आहे. या आदेशाची प्रत कधी मिळेल अशी विचारणा कर्वे करतात. त्यावर दोन दिवसांत मिळेल, असं उत्तर सोमय्यांनी दिलं आहे. यानंतर हे संभाषण कर्वे रामदास कदमांच्या कानावर घालतात. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना (अनिल परब) राजीनामा द्यावा लागेल, असं कदम म्हणतात. मनसेचे नेते आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या ऑडिओ क्लिप पुढे आणल्या आहेत.

रिसॉर्ट पाडण्यासाठीही कदमांनी पुरवली रसद?अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टविरोधातही रामदास कदम यांनीच सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोमय्यांनी गुन्हा दाखल केला आहे, असं कर्वे कदमांना फोनवर सांगतात. दिल्लीची टीम रिसॉर्टच्या पाहणीसाठी आली आहे, अशी माहितीदेखील कर्वे कदमांना देतात. त्यावर मग तर आता हा मेला. वाट लागली. कारण ते बांधकाम १०० टक्के सीआरझेडमध्ये येतं, असं कदम म्हणतात.ती ऑडिओ क्लिप खोटी; अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- कदममनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमAnil Parabअनिल परबKirit Somaiyaकिरीट सोमय्या