जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत मोदी; रामदास आठवलेंचं मजेशीर विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:11 IST2020-03-03T12:57:23+5:302020-03-03T13:11:02+5:30
आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचं आठवले म्हणाले.

जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत मोदी; रामदास आठवलेंचं मजेशीर विधान
मुंबई : नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या विधानांमुळे चर्चेत असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मजेशीर विधान केलं आहे. “जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत मला मंत्रीपद आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मोदी असल्याचं” मजेशीर विधान आठवले यांनी केलं आहे.
नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत बोलत असताना आठवले म्हणाले की, कार्यकर्त्यांना नेहमीच पद दिले जाते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रीपद दिल्याने मला चांगलं वाटलं. मी एक कार्यकर्ता असून आज मंत्री आहे, बहुतेक उद्या नसेलही. मात्र “जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत मी मंत्रीपदी राहणार. तसेच जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी असल्याचंही ते म्हणाले.
तर हे आमच्या दोघात ठरले असल्याचं आठवले म्हणाले. आमचा पक्ष जातीवादी लोकांच्या सोबत असल्याचे अनेकजण बोलत असतील. मात्र आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचं आठवले म्हणाले.