शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:52 IST

भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे राज ठाकरेंच्या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना

पुणे : ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.   ‘‘मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले. वंचित आघाडीचा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता बुधवारी (दि. १०) आठवले पत्रकारांशी बोलत होते. ‘‘आंबेडकर दोनदा खासदार झाले. परंतु, दोन्हीवेळी ते कॉंग्रेस बरोबर होते. भाजपा-शिवसेना किंवा कॉंग्रेस आघाडीसोबत गेल्याशिवाय महाराष्ट्रात निवडून येत नाही. त्यांच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसले. माझ्याही पुण्या-ठाण्यातल्या सभा जोरदार झाल्या,’’ असे आठवले म्हणाले. मी सगळ््या आघाड्यांचे प्रयत्न करुन भाजपासोबत आलो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तिसरी आघाडी  मान्य होत नाही. जिंकण्याइतकी मते तिसºया आघाडीला मिळू शकत नाहीत. ‘वंचित’चा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमत असल्याबद्दल टिप्पणी करताना आठवले म्हणाले, की त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट मोठे असल्याने सभा चांगल्या होतात. पण या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाही. ..................प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रेम‘‘भाजपा आणि शिवसेना यांच्यातले मतभेद टोकाला गेले असतानाही राजकीय परिपक्वता दाखवत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातले वाद टोकाचे नसूनही आमचे वाद मिटत नाहीत. त्यांना माझा तिटकारा का वाटतो हे मला माहिती नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.’’ - रामदास आठवले 

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरgirish bapatगिरीष बापट