राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 05:25 PM2021-02-13T17:25:05+5:302021-02-13T17:26:58+5:30

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' म्हणत जोरदार टोला लगावला होता. (Rahul Gandhi)

Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do | राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

राहुल गांधींनी लग्न करून ‘हम दो हमारे दो’ची अंमलबजावणी करावी,रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले...

googlenewsNext

पुणे -काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत केंद्रातील मोदी सरकारला 'हम दो-हमारे दो' (Hum Do Hamare Do) म्हणत जोरदार टोला लगावला होता. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी राहुल यांना मोलाचा सल्ला दिला आहे. "राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि 'हम दो-हमारे दो'ची अंमलबजावणी करावी, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आठवले हे नेहमीच आपल्या कवितांमुळे चर्चेत असतात. (Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do)

"मोदी असो किंवा मनमोहन सिंग, राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा अपमान"; अर्थमंत्री संतापल्या 

शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले आठवले? -
आठवले म्हणाले, दिल्लीतील शेतकरी आंदोलन वाढवत आहेत. सरकार चर्चेला तयार आहे. पण, कायदेच मागे घ्या, ही आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांची ही भूमिका असंवैधानिक आहे. तसेच 200 शेतकऱ्यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे शेतकरीच जबाबदार आहेत. तिरंग्याचा अपमान दुर्दैवी आहे. याच बरोबर नवडणूक काळात काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात कृषी कायद्याचे आश्वासन दिले होते, याची आठवणही आठवले यांनी करून दिली. 

पूजा चव्हान आत्महत्येसंदर्भात बोलताना, पूजा यांच्या आत्महत्येस कुणी जबाबदार असेल तर त्याची चौकशी व्हावी, असंही आठवले म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

राहुल गांधींच्या ‘हम दो, हमारे दो’ वक्तव्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा पलटवार; भरसभागृहात म्हणाले...

राहुल गांधींनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे - 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'हम दो हमारे दो' विधानावरून सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी नेहमीच पंतप्रधानांचा अपमान केला आहे. मग ते सद्य पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग.. माजी पंतप्रधान परदेशात गेले असताना राहुल गांधींनी त्यांच्याकडून आणण्यात आलेला अध्यादेश फाडून फेकून दिला होता, याची आठवण सीतारामन यांनी करून दिली. 

‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात
 

Web Title: Ramdas Athavale Advice Rahul Gandhi Should Get Married And Implement Hum Do Hamare Do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.