शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मी ५० हजार लोक घेऊन तिथं येतो, मग बघू...; नाना पटोलेंचा राहुल गांधींना निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:40 IST

प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

मुंबई - आपल्या देशात धर्माच्या नावानं राजकारण सुरू आहे. रामाचं नाव घ्यायचे अन् दुसरीकडे द्वेष पसरवायचा याचा आम्ही निषेध करतो. आसाममध्ये राहुल गांधी मंदिरात दर्शन करण्यासाठी जाताना त्यांना प्रवेश नाकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरात दर्शन नाकारणारी प्रवृत्ती सत्तेत आलेत का असा प्रश्न उभा राहतो. भगवान श्री रामाने अहिंसेचा मार्ग आम्हाला शिकवला. परंतु भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला. तो माज उतरवल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही असा निशाणा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर साधला आहे. 

नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींच्या यात्रेला आसाममध्ये रोखण्याचे काम केले जात आहे. मंदिरात जाण्यापासून राहुल गांधींना रोखले गेले. यात्रेच्या वाहनावर दगडफेक करणे,  मारहाण करणे हे भगवान श्री रामानं शिकवले का?. आमच्या नेत्यांना मी म्हणालो तुम्ही आवाहन करा, चलो आसाम, मग कुठले मुख्यमंत्री, पंतप्रधान काय करतात ते बघू. तुम्हाला अडवलं तर आम्ही येतो, महाराष्ट्रातून मी ५० हजार लोक घेऊन येतो, देशातून असे लोक तिथे गेले तर काय होईल बघू,  मी माझा विचार राहुल गांधींसमोर मांडला. तेव्हा आपल्याला अहिंसेच्या मार्गातून जायचे आहे. कुठलाही उद्रेक नको. आपण अहिंसा, प्रेमाने जनतेला जिंकायचे. सत्याच्या मार्गाने विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीत करण्यात आले. त्याचा गाजावाजा केला नाही. अयोध्येतील मंदिराबाबत शंकराचार्यांनी विरोध केला. मात्र हे धर्मापेक्षा आणि शंकराचार्यापेक्षा मोठे झाले आहेत. भाजपाला काय उत्सव साजरा करायचा हा अधिकार त्यांचा आहे. भगवान श्रीरामाला लहान आणि मोदींना मोठे करायचे असेल तर काय बोलणार. भगवान श्री रामाला भाजपा लहान मानायला लागले आहेत. भाजपाच्या गर्वाचे हरण आज ना उद्या होणारच आहे. राजीव गांधी यांनी राम मंदिराचा ताळा उघडला होता. त्यांनीच पूजा केली. मात्र कारसेवक, मुस्लीमांचे रक्त भाजपाने वाहिले. जो उद्रेक भाजपाने केला, ज्यांचे जीव गेले त्यांचे काय?. हिंदू शंकराचार्य हे भाजपावर टीका करतायेत. अशा शंकराचार्यांवर भाजपा टीका करते. प्रत्येक धर्मात नियम असतात. परंतु राजकारणासाठी इव्हेंट केला जात असेल तर योग्य नाही असं सांगत नाना पटोलेंनी भाजपावर टीका केली. 

दरम्यान, रामनाम जपायचे अन् पैसे लुटायचे हे भाजपाचे काम आहे. लोकांकडून लुटलेले पैसे मूठभर मित्रांकडे पाठवले जातात. अपूर्ण मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शंकराचार्यांनी हे करू नये अशी भूमिका घेतली. पण भाजपाने राजकीय फायद्यासाठी हा इव्हेंट घेतला. त्यामुळे निमंत्रण मिळूनही अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला. अहंमपणा रामाने शिकवला नाही. अहंमपणाचा नाश रामाने केला असं नाना पटोले यांनी म्हटलं.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी