शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं"; मुख्यमंत्री शिंदेंचा सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:36 IST

संपूर्ण मंत्रिमंडळासोबत अयोध्येत रामललाच्या दर्शनाला जाणार असल्याचेही सांगितले

Ayodhya Ram Mandir Pranpratishtha : रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हे फक्त माझेच नव्हे तर तमाम रामभक्तांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि करोडो रामभक्तांचे स्वप्न होते की अयोध्येत राम मंदिर व्हावे आणि त्यात रामलला विराजमान व्हावेत. भव्य दिव्य राममंदिर उभे राहिले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार  आहे. महाराष्ट्राचे अयोध्या आणि रामललाशी एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेले. हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं; अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवणाऱ्यांवर जोरदार टीका केली.

बहिष्कार टाकणाऱ्यांना सद्बुद्धी मिळू दे!

"जे लोक रामाचे नाहीत, ते कामाचे नाहीत. ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. सर्वांनी या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. पण काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, 'जो राम के नहीं, वो काम के नहीं", असे ते म्हणाले.

दरम्यान, गेली कित्येक शतके ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली गेली, संघर्ष केला, तो क्षण अखेर अवघ्या जगाने अनुभवला. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी