कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा

By Admin | Updated: August 2, 2016 16:45 IST2016-08-02T16:18:37+5:302016-08-02T16:45:11+5:30

लग्नास नकार देणा-या तरूणीवर चाकूने वार करणा-या तरूणावर गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याच्या निषेधार्थ कोळी समाजाने शिंदखेडा पोलिस स्टेशनवर मोर्चा काढलाय

A rally on the Shindkheda police station by the Koli community | कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा

कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा

ऑनलाइन लोकमत

शिंदखेडा, दि. २ - महाविद्यालयीन तरुणीने लग्नास नकार दिल्याने रस्त्यात अडवून तिच्या गळा  व छातीवर चाकूने वार करणार्या मयूर गिरासे या युवकास पोलिसांनी रात्री 3 वाजता तापीकाठच्या एका मक्क्याच्या शेतातून पकडले. त्यानंतर कोळी समाजाने शिंदखेडा पोलीस स्टेशन समोर सुरु केलेले ठिय्या आंदोलन समाप्त झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता गुन्हा दाखल करण्यास व घटना स्थळी पोहचण्यास उशीर करणार्या पोलीस अधिकार्याना निलंबित करण्याच्या मागणी साठी कोळी समाजातर्फे शिंदखेडा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. मोर्चात शानाभाऊ कोळीसह म़ोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी याना निवेदन देण्यात आले

Web Title: A rally on the Shindkheda police station by the Koli community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.