शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

RajyaSabha Election Maharashtra: वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:34 IST

भाजपाकडून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना हे पाऊल उचलणार आहे. सत्ता स्थापन करताना देखील शिवसेनेने आपले आणि समर्थन दिलेल्या आमदारांना असेच हॉटेलमध्ये ठेवले होते. 

मविआने दिलेली विधान परिषदेला जागा सोडण्याची ऑफर भाजपाने नाकारल्यानंतर शिवसेनेने खबरदारीचे उपाय घेण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार माघारी घेण्यास अवघा दीड तास शिल्लक आहे. यामुळे दोन्ही बाजुंकडून कोणताही तोडगा निघत नसल्याने जर निवडणूक झाली तर दगफटका नको म्हणून शिवसेनेने हालचाली सुरु केल्या आहेत. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

भाजपाने महाविकास आगाडीचा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी येत्या ६ जून रोजी सर्व अपक्ष आमदारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे. यावेळी राज्यसभा निवडणुकीतील मतदानावरून चर्चा केली जाईल. जे अपक्ष आमदार तिथे येतील त्यांना आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतीलच पंचतारांकीत हॉटेल ट्रायडन्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. 

RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले

या आमदारांना ८ ते १० जून याकाळासाठी हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. भाजपाकडून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना हे पाऊल उचलणार आहे. सत्ता स्थापन करताना देखील शिवसेनेने आपले आणि समर्थन दिलेल्या आमदारांना असेच हॉटेलमध्ये ठेवले होते. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. 

चंद्रकांत पाटील काय म्हणालेले...

शिवसेनेकडे जादाची १३ मते आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तुरुंगात आहेत. त्यामुळे ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची ८-९ मते आहेत. याउलट आमच्याकडे ३० मते आहेत. यामुळे त्यांनी उमेदवारी माघारी घ्यावी, ही वस्तूस्थिती चर्चेमध्ये मांडली. चर्चा खेळीमेळीत झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाMLAआमदार