शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चारही जागा जिंकणारच! महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे, पवार, खरगेंचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 06:57 IST

rajya sabha election 2022 : निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले.  हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्ष तसेच समर्थक अपक्ष आमदार उपस्थित होते.

मुंबई : कोणी कितीही प्रयत्न केले तरी राज्यसभेच्या सहापैकी चार जागा महाविकास आघाडी जिंकणारच, त्यानंतर जल्लोषासाठी पुन्हा एकत्र येऊ, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. निवडणुकीच्या तीन दिवस आधी या निमित्ताने महाविकास आघाडीने ऐक्याचे प्रदर्शन घडविले. हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या या बैठकीला तिन्ही पक्ष तसेच समर्थक अपक्ष आमदार उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जून खरगे यांनी केंद्रातील भाजपचे सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करीत असल्याची टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित अपक्ष व लहान पक्षांचे आमदारकॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल असे १३ अपक्ष वा लहान पक्षांचे आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. 

यापैकी आघाडी सरकार स्थापन होताना विनोद अग्रवाल व गीता जैन हे भाजपसोबत होते. त्यावेळी तटस्थ असलेले माकपचे विनोद निकोले आज उपस्थित होते. प्रहार संघटनेचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू व राजकुमार पटेल मात्र हजर नव्हते. अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या २९ इतकी आहे.

एमआयएमची मते कुणाला? आमची मते हवी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, अशी गुगली एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असदुद्दिन ओवेसी यांनी टाकली. आमदार कुणासोबत जातील की तटस्थ राहतील, हे एक-दोन दिवसांत जाहीर करू, असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्येभाजपचे सर्व आमदार बुधवारी सायंकाळी ६ पासून कुलाब्यातील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी जाणार आहेत. १० जूनला मतदानास जाईपर्यंत त्यांचा या ठिकाणी मुक्काम असेल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांना मार्गदर्शन करतील. मतदानाची पद्धत आमदारांना समजाविली जाईल.

आमदारांच्या नाराजीची ठाकरे, पवारांकडून दखलमहाविकास आघाडीतील तसेच समर्थित अपक्ष आमदारांमध्ये निधी वाटपावरून नाराजी असल्याची दखल मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनीही त्यांच्या भाषणातून घेतली. या निवडणुकीनंतर सगळ्यांना घेऊन बसा आणि सगळ्यांचे समाधान करा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. राज्यसभा निवडणुकीनंतर या विषयी तातडीने बैठका घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. आपण एक आहोत, एकत्रच राहू आणि निश्चितपणे जिंकू. राज्यसभेनंतर विधान परिषदेची निवडणूकही आघाडीच जिंकणार यात कुठलीही शंका नाही.    - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला गाडलं, तेच आपल्याला इथे करायचे आहे. सत्तापिपासू लोक षडयंत्र रचत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. विजय आपलाच आहे. विजयानंतर पार्टी आपल्यालाच करायची आहे.     - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRajya Sabhaराज्यसभा