शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राज्य बँक घेणार साखर परिषद : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:40 IST

इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल..

ठळक मुद्देउद्योगांच्या अडचणींवर होणार मंथन चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार

पुणे : कर्जदाराचे कर्ज बुडीत झाल्यानंतर बँका संबंधिताची मालमत्ता जप्त करुन उद्योगच बंद करते. मात्र, कारखान्यांची खाती अनुत्पादक (एनपीए) होऊ नये यासाठी बँकांनी देखील आपली भूमिका पार पाडली पाहीजे, या हेतूने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुण्यात साखर परिषद बोलावली आहे. येत्या शनिवारी (दि. ६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. रविवारी (दि. ७) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप होईल. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे आणि व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख या वेळी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्व संध्येला (दि. ५) आयोजित सहकार प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सहकार मंत्री सुभाष देशमुख, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार आयुक्त सतीश सोनी या वेळी उपस्थित राहतील.इथेनॉलचे शाश्वत उत्पादन, कारखान्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर आणि खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती आणि वीज निर्मितीच्या धोरणावर शनिवारी चर्चा होईल. कानपूरच्या राष्ट्रीय ऊस संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन, प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार, मिटकॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील नातू यात सहभागी होतील. रविवारच्या चर्चासत्रात ऊस लागवड, उसावरील रोग व कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, साखरेचा दर्जा आणि वितरण व्यवस्थेवर चर्चा होईल. त्यात कृषी भूषण संजीव माने, जैन इरिगेशनचे अभय जैन, ब्रिटानियाचे उपाध्यक्ष मनोज बालगी यात सहभागी होतील. दुपारी ३ वाजता होणाऱ्या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सहभागी होणार आहेत.  कर्ज, त्याची परतफेड अथवा मालमत्ता विकून त्याची वसुली अशी बँकाची भूमिका मर्यादित नाही. बँकेचा पैसा संबंधित उद्योगात गुंतला असल्याने ती देखील एकप्रकारे त्या व्यवसायाची भागीदारच असते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मालमत्ता विकून संबंधित व्यवसाय बंद करण्याची भूमिका नसावी. उलट संबंधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी काय करता येईल, याचा देखील विचार बँकांनी केला पाहीजे, त्यासाठी साखर परिषद आयोजित करण्यात आल्याचे अनास्कर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारbusinessव्यवसाय