शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

येस बँकेत पैसे अडकलेल्या बँकांसाठी राज्य बँक आली धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 22:30 IST

आरबीआयने येस बँकेवर ५ मार्च रोजी घातले निर्बंध

ठळक मुद्दे७२ बँकांना मदतीचा हात : आरटीजीएस, एनईएफटीसारखे व्यवहार होणार पूर्ण

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक निर्बंध घातल्याने ७२ नागरी सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपये येस बँकेत अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक धावून आली आहे. राज्य बँकेत कोणत्याही ठेवी न ठेवता या बँकांचे खाते उघडण्यात येणार असून, त्यांचे अडकलेले आरटीजीएस, एनईएफटी अशा विविध सेवा पूर्ववत होणार आहेत. आरबीआयने येस बँकेवर ५ मार्च रोजी निर्बंध घातले आहेत. या बँकेत ७२ नागरी सहकारी बँकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या सहकारी बँकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस), नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी), यूपीआय, आयएमपीएस या सेवा घेणाºया या नागरी बँकांचे व्यवहार पूर्ण न होण्याची भीती आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला असून, कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता, तसेच कोणत्याही अटीविना त्यांना या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्य बँकेमधे सेवा घेण्यासाठी या बँकांना आरबीआयच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. येस बँकेने या पूर्वीच या बँकांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. बँकिंग सुविधा मिळविण्यासाठी या बँकांना राज्य बँकेत खाते सुरू करावे लागेल. त्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती अथवा ठेवी ठेवाव्या लागणार नाहीत. तसेच, खाते सुरू झाल्याच्या दिवसापासूनच सर्व सुविधा या बँकांना दिल्या जातील, असे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. मार्च २०१९ अखेरीस राज्य बँकेकडे भांडवल पर्याप्तता १५.६० टक्के असून, नक्तमूल्य (नेटवर्थ) २,६८२ कोटी रुपये आहे. तसेच, १२ मार्च २०२० पर्यंत बँकेची आर्थिक उलाढाल ४१,५२१ कोटी रुपये आहे. तर, येत्या ३१ मार्च अखेरीस बँकेचे नेटवर्थ ३२५० कोटी आणि नफा साडेचारशे कोटींवर जाईल, असे अनास्कर म्हणाले. 000

टॅग्स :PuneपुणेbankबँकYes Bankयेस बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजी