राजू शेट्टी यांनी घेतली राहुल गांधींची भेट, यूपीएत जाण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 21:09 IST2018-03-19T21:09:53+5:302018-03-19T21:09:53+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेले खासदार राजू शेट्टी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

Raju Shetty's meet Rahul Gandhi | राजू शेट्टी यांनी घेतली राहुल गांधींची भेट, यूपीएत जाण्याचे संकेत

राजू शेट्टी यांनी घेतली राहुल गांधींची भेट, यूपीएत जाण्याचे संकेत

 नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेले खासदार राजू शेट्टी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी शेट्टी आणि राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. मात्र राजू शेट्टी यांच्या यूपीएमधील प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले," मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. मी त्यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या शेतकरी परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होते. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतो. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल."  सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या सत्तेचा सूर्य कधीच मावळणार नाही, असा अहंकार झाला आहे. पण सूर्योदयानंतर सूर्यास्त हा होतोच, असा टोलाही त्यांनी लगावला.  

Web Title: Raju Shetty's meet Rahul Gandhi