शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके : कलगीतुरा रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 20:47 IST

politics, Raju Shetty , Sadabhau Khot, Sangli , kolhapur, Swabimani Shetkari Sanghatna स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके फुटले. खोत यांनी वेळप्रसंगी राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावू, असे जाहीर वक्तव्य करून स्वाभिमानीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यावर पलटवार करताना शेट्टी यांनी, फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांचे हात व चारित्र्य अस्वच्छ आहे, अशी टीका केली. ​​​​​​​

ठळक मुद्देराजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके : कलगीतुरा रंगला फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे शेट्टींचा पलटवार

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांचे फटाके फुटले. खोत यांनी वेळप्रसंगी राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावू, असे जाहीर वक्तव्य करून स्वाभिमानीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यावर पलटवार करताना शेट्टी यांनी, फालतू माणसाच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांचे हात व चारित्र्य अस्वच्छ आहे, अशी टीका केली.भाजपने पुणे पदवीधर निवडणुकांसाठी खोत यांनी रयत क्रांतीचा स्वतंत्र उमेदवार दिला होता. राजू शेट्टी यांनी प्रस्थापितांची साथ सोडली, तर निश्चितपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असे वक्तव्य खोत यांनी सोमवारी केले होते. त्यावर शेट्टी यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही.

स्वत:चे अस्तित्व दाखविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. ज्या ठिकाणी आहेत, तेथून आणखी काही तरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर कडकनाथ योजनेमधील पैसे परत करा, शेतकऱ्यांबद्दल पुतनामावशीचे प्रेम दा‌खवू नका, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.शेट्टी यांच्या टीकेनंतर खोत यांनीही पलटवार केला. ते म्हणाले की, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या अंगणात आमदारकीसाठी लोटांगण घालत गेलेत. राजू शेट्टी यांचे हात स्वच्छ आहेत, हे मला माहीत आहे. हेच हात आमच्या हातात होते, तेव्हा शेट्टी रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत होते का? आता काय रोज गोमूत्राने आंघोळ करतात काय? 

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला आपण फारसे महत्त्व देत नाही. स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी ते काहीही बरळत असतात. अशा फालतू माणसाच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही.- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना