शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

राजू शेट्टी - प्रकाश आंबेडकर यांची हातमिळवणी?

By atul.jaiswal | Updated: September 29, 2018 14:15 IST

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.

ठळक मुद्देरविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे रविकांत तूपकर यांनी सांंगितले. 

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या दोहोंमध्ये येत्या  ६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे होणार असलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली.  दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी  हातमिळवणी जवळपास निश्चित झाली आहे. युतीबाबत अ‍ॅड. आंबेडकर सकारात्मक आहेत. पुढील वाटाघाटासाठी खासदार राजू शेट्टी आणि अ‍ॅड. आंबेडकर यांच्यात मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे रविकांत तूपकर यांनी सांंगितले. 

भारिपला काँग्रेसचे वावडे नाहीअ‍ॅड. आंबेडकर व रविकांत तूपकर यांच्यादरम्यान अकोला येथे पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध कडवट झाल्याचे पृष्ठभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांनी भारिपला काँग्रेसचे वावडे नसल्याचे स्पष्ट केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारिपमध्ये युती झाल्यास काँग्रेसलाही सोबत घेण्याला आपला विरोध नसल्याचे आंबेडकर यांनी रविकांत तूपकर यांना सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाRaju Shettyराजू शेट्टीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ