शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध कायम- राजू शेट्टी

By admin | Updated: May 30, 2015 02:03 IST

बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत भुमिअधिग्रहन कायद्यामध्ये दोन सुधारणा करण्याची मागणी.

बुलडाणा: भुमि अधिग्रहन कायदा हा जुना आहे. तसा हा कायदा शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेला आहे. संसदेत आम्ही व काही घटक पक्षाने या कायद्याला विरोध दर्शविल्यामुळेच या कायद्यामध्ये केंद्र सरकारने आतापर्यंत ९ सुधारणा केल्या आहेत; मात्र अद्याप दोन सुधारणा या कायद्यामध्ये अजूनही बाकी असून जो पर्यंत ह्या सुधारणा होणार नाहीत तोपर्यंत या कायद्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध राहील अशी भुमिका खा. राजू शेट्टी यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे बुलडाणा जिल्ह्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या सोबत यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, सतिष बुरुळकर, योगेश पांडे, गजानन अमदाबादकर उपस्थित होते. खा. राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही सत्तेत असतानाही शेतकर्‍यांच्या हीतासाठी भुमिअधिग्रहन कायद्याला विरोध केला. त्यातून सरकारला या कायद्यामध्ये ९ सुधारणा कराव्या लागल्या. अद्याप दोन सुधारणा बाकी आहेत. यामध्ये शेतकर्‍यांच्या परवाणगी शिवाय जमिन अधिग्रहीत करू नये आणि ५ वर्षात प्रकल्प उभा न राहल्यास जमिन शेतकर्‍यांना परत करावी. अशा ह्या दोन सुधारणा आहेत. ह्या सुधारणा जो पर्यंत मान्य करणार नाही तोपर्यंंत या कायद्याला आमचा विरोध असेल. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी मान्य करून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्यावे हे सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही याची खंत व्यक्त करताना शेती क्षेत्रावर भांडवली गुंतवणूक होणे आवश्यक होती, दुर्दैवाने तेही होतांना दिसत नसल्याचे खा. शेट्टी यांनी सांगीतले. यावर तुमच्या मागण्या सरकार मान्य करत नसेल तर सरकारमधून बाहेर पडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरात मात्र आम्ही संघर्ष करू येवढेच उत्तर खा. राजू शेट्टी यांनी दिले.

*सरकारच्या मागे कटोरा घेवून फिरणार नाही!

     केंद्रात सत्ता आल्यास सत्तेत वाटा द्यावा अशी आमची मागणी होती. विस्तारीत मंत्रीमंळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रीपद देण्याचे कबुल सुध्दा केले आहे. मात्र दिलेला शब्द पाळणे सरकार कर्तव्य आहे. आम्ही मंत्रीपदासाठी त्यांच्या मागे कटोरा घेूवन फीरणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत असा टोला. खा. राजू शेट्टी यांनी मारला.

*हे तर शेतकरी चळवळीचे अपयश

      विदर्भातील शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आत्महत्या थांबता थांबेनात, शेतकरी आत्महत्येला कारणे अनेक असतील पण ,यावर कायमस्वरूपी उपाय अद्याप आम्ही शोधू शकलो नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत हे शेतकरी चळवळीचे अपयश आहे. या बद्दल आम्हालाही आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे अशी कबुली देत खा. राजू शेट्टी म्हणाले की, आता यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद विदर्भाला आम्ही मुद्दाम दिले. या माध्यमातून या भागात शेतकरी चळवळ उभी करून शेतकर्‍यांना शेतीला उद्योगाची जोड कशी देता येईल यासाठी येणार्‍या काळात रविकांत तुपकर काम करतील असे त्यांनी सांगीतले.