“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:30 IST2025-12-10T15:27:52+5:302025-12-10T15:30:51+5:30
Raju Shetti News: खरेतर यांना लोकशाहीचे आणि संविधानाचे नाव घ्यायचा अधिकार नाही, अशी करण्यात आली आहे.

“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
Raju Shetti News: उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मविआची मागणी आहे. जाधव यांच्यासाठी उद्धवसेनेने तर पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रदेखील दिले आहे. महायुती सरकारला वर्ष झाले, तरी विधानसभा, विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्यांची निवड निश्चित करण्यात आलेली नाही. यावरून विरोध पक्षाने सरकारवर टीका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी सहकार्याची ऑफर भाजपाने दिल्याची खात्रीलायक माहिती असून या गुगलीद्वारे महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचे म्हटले जात आहे. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली
इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. लोकशाहीचे धिंडवडे काढायचे काम सरकारने ठरवले आहे. तुम्हाला जर पाशवी बहुमत आहे जर संविधानिकरित्या जे विरोधी पक्षनेता पद ते विरोधी पक्षनेते पद सरकार का देत नाही हा माझा सवाल आहे. एवढे सरकार कुणाला घाबरत आहे? घाबराये कारणच काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
दरम्यान, सभागृहाची विरोधी पक्षनेता शान आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता असला पाहिजे. म्हणून विरोधी पक्षनेते पद दिलेले होते. आताच अशी काय अडचण आली की, सरकार विरोधी पक्षनेता होऊ देत नाही. मागच्या पाच वर्षांत मोदी सरकार संसदेत विरोधी पक्षनेता होऊ देत नव्हते. जे देशात कधी झाले नव्हते, ती पंरपरा मोदींनी देशात सुरू केली राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही पंरपरा सुरू केली. हे लोक संविधानाची भाषा करतात, लोकशाहीची भाषा करतात, ही आश्चर्याची गोष्ट आहे. खरेतर यांना लोकशाहीचे नाव घ्यायचा अधिकार नाही, संविधानाच नाव घ्यायचा अधिकार नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.