शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:47 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचा दावा केला.

उपराष्ट्र्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, तर एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. दोन्ही बाजूंनी मोठी तयारी केली असून काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. यादरम्यान त्यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. 

सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. "संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली. त्यांनी इतरांनाही असेच केले असेल. हे त्यांचे काम आहे, असा दावा राऊतांनी केला. 

तामिळनाडूचे अनुभवी भाजप नेते राधाकृष्णन यांनी बुधवारी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

रेड्डी यांना विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार म्हणून निवडण्याच्या हालचालीमुळे उपराष्ट्रपतींची निवडणूक रंजक बनली. दोन्ही उमेदवार दक्षिणेतील आहेत. 

उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या निवडणूक मंडळात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतात. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य देखील मतदान करू शकतात. निवडणूक मंडळाची प्रभावी संख्या ७८१ आहे आणि बहुमताचा आकडा ३९१ आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र