शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
5
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
6
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
7
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
8
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
9
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
10
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
11
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
12
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
13
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
14
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
15
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
16
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
17
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
18
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
19
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
20
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, रविवारी स्वीकारणार पदभार, १ वर्षाचा मिळणार कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 06:06 IST

आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर अग्रवाल १९८९ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले

मुंबई - राज्याचे मावळते मुख्य सचिव राजेश कुमार यांना शुक्रवारी मंत्रालयात आयोजित एका छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती झाली असून ते रविवारी पदभार स्वीकारणार आहेत. १९८९ च्या तुकडीचे अधिकारी असलेले अग्रवाल हे नुकतेच केंद्रीय सेवेतील प्रतिनियुक्तीवरून राज्याच्या सेवेत परतले आहेत. अग्रवाल यांना मुख्य सचिव म्हणून एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. नियत वयोमानानुसार ते ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होतील.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून बजावली मोलाची कामगिरी

आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीत बी. टेक. पदवी घेतल्यानंतर अग्रवाल १९८९ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. नागरिकांच्या विविध डेटाबेसचे विश्लेषण करून बनावट लाभार्थ्यांची छाननी करणे, तसेच पात्र नागरिकांपर्यंत अनुदान व शासकीय लाभ अचूकपणे पोहोचवणे यात त्यांचे विशेष कार्य आहे. ई-गव्हर्नन्सचा प्रसार, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी करणे आणि शासन सेवांची गुणवत्ता सुधारण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात ते आधार आणि जनधन मोहिमेशी जोडले गेले. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अॅडज्युडिकेटिंग ऑफिसर म्हणून ७०हून अधिक निर्णय घेत त्यांनी सायबर न्यायशास्त्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajesh Aggarwal Appointed Maharashtra's New Chief Secretary, Tenure of One Year

Web Summary : Rajesh Aggarwal assumes the role of Maharashtra's Chief Secretary, succeeding Rajesh Kumar. An officer of the 1989 batch, Aggarwal returns from central deputation. He is known for his e-governance initiatives and contributions to cyber law and will serve a one-year term.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र