शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:25 IST

Raj Thackeray Manoj Jarange Maharashtra Election 2024: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंना सवाल केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावले. 

Raj Thakeray Latest News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण मिळू शकत नाही, असे स्पष्ट भूमिका मांडली. सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा की आरक्षण कसं देणार हे आधी सांगा, असे आवाहन राज ठाकरेंनी मराठा समाजाला केले. 

मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सभा झाली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला. मराठा आरक्षण मिळू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.राज ठाकरे मराठा आरक्षणाबद्दल काय बोलले?

राज ठाकरे म्हणाले, "जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा", असा सवाल राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना केला. 

"ही सत्य परिस्थिती जरांगेंसमोरही मांडली होती" 

"बाबानों, मी या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय. हे तु्म्हाला फक्त झुलवताहेत. हे राजकीय पक्ष जे आहेत, ते तुम्हाला झुलवताहेत. फक्त भूलथापा देताहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. हीच सत्य परिस्थिती मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, त्यावेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती", असे राज ठाकरे म्हणाले.  

तुमच्या हातात तरी आहे का ते? ठाकरेंचा शिंदेंना सवाल

"हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे जे तुम्हाला येऊन सांगताहेत ना की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसं? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं जा, दिलं आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतंही राज्य सरकार देऊ शकतं का? तामिळनाडूत असा प्रकार झाला. तामिळनाडू सरकारने सांगितलं आरक्षण दिलं. तो विषय सर्वोच्च न्यायालयात पडलेला आहे. त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावर आपण भांडतो आहोत", असे राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे