राज ठाकरेंची तोफ धडाडली.. कडोंमा प्रचाराचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2015 21:01 IST2015-10-23T21:01:46+5:302015-10-23T21:01:46+5:30

पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही

Raj Thackeray's assassination started | राज ठाकरेंची तोफ धडाडली.. कडोंमा प्रचाराचा शुभारंभ

राज ठाकरेंची तोफ धडाडली.. कडोंमा प्रचाराचा शुभारंभ

ऑनलाइन लोकमत 

कल्याण, दि.२३ - पाच वर्षासाठी माझ्या हाती सत्ता देऊन बघा कल्याण-डोंबिवलीचे रुप बदलून टाकेन, नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा विकास करेन जर जमले नाही तर पुन्हा केडीएमसची निवडणूक लढवणार नाही, असे खडे बोल राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकाच्या प्रचाराच्या आपल्या सभेत केले. आपल्या पहिल्याच सभेत राज ठाकरे यांची तोफ विरोधकांवर  कडाडली. आधीच्या सरकारच्या काळात दाभोलकरांची हत्या, या सरकारच्या काळात पानसरेंची हत्या, दोन्ही सरकार मध्ये फरक काय? असा सवाल ही त्यांनी केला. शरद पवार, मुख्यमंत्री देवेद्रं फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा, आबु आजमी यांच्यावर ही राज ठाकरेंची तोफ कडाडली, 
 
राज ठाकरे यांच्या भाषणातील काही ठकळ मुद्दे  -
>  भाजप-सेनेने २० वर्षाता कल्याण-डोंबविलीची वाट लावली आहे.
>  सत्ता परिवर्तन होऊनही विकास झाला नाही 
>  नाशिक मधील माझ्या कामाचा आढावा २८ आणि २९ तारखेच्या सभामध्ये देणार आहे
>  काही ठिकाणी जैन लोकांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे 
>  एका बाजुने नायजेरियन ड्रग पुरवठा करत आहेत, दुसरीकडे बांगलादेशी, उत्तर भारतीय येत आहेत.
>  थापांना पर्यायी शब्द म्हणजे भाजपा 
>  पैसे मागण्यासाठी मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर जातात - राज ठाकरे
>  अनाधीकृत घरे फक्त मराठी माणसांचीच का पाडली जातात.
>  १०० दिवसांत अच्छे दिन आणणार होते, ५०० दिवस आहेत अजून अच्छे दिन आले नाही
>  केंद्रात आणि राज्यात काँग्रेस जाऊन भाजपची सत्ता आली तरी लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना दूर झालेली नाही.

Web Title: Raj Thackeray's assassination started