शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 05:41 IST

विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता.

मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन तास बंद दाराआड झालेल्या बैठकीत आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकीत एकमेकांसमोर नव्हे तर एकमेकांसाेबत राहून महायुतीला थोपविण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत.

मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी मनसेने महत्त्वाच्या जागांवर दावा केला आहे. त्यानंतर मनसे व उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली. यात सुमारे ८० जागांवर मनसे आग्रही आहे. तर, २०१७च्या आकडेवारीवर आधारित वाटप व्हावे, अशी उद्धवसेनेची भूमिका आहे. यातील काही ठिकाणी दोन्ही पक्ष आग्रही असल्याने जागावाटपात तिढा निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी राज यांच्या भेटीला उद्धव गेले होते. संभ्रम असलेल्या जागांबाबत दोन्ही बंधू प्रत्यक्ष बसून निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीदरम्यान समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. वरळी व माहीममध्ये त्यावेळी मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती न होता मराठी मतदारांना एकत्र आणणे, मुंबईतील बदललेली परिस्थिती, भाषा वाद तसेच एकमेकांची ताकद अजमावण्यापेक्षा परस्परांना पूरक कसे होऊ, यावर दोन्ही नेते भर देत आहेत, असा दावा सूत्रांनी केला.

निवडणूक पुढे गेल्यास?महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेण्यास उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र, त्याला काँग्रेसचा विरोध आहे. आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचे एकत्रीकरण करण्याबाबत व मनपा निवडणूक पुढे ढकलल्यास त्याची रणनीती काय असावी, यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj-Uddhav Thackeray Meet: Unity Talks to Challenge MahaYuti in BMC Elections?

Web Summary : Uddhav Thackeray met Raj Thackeray to discuss upcoming Mumbai municipal elections. They explored strategies to unite against the MahaYuti alliance and resolve seat-sharing disagreements, aiming for Marathi voter unity.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेElectionनिवडणूक 2024Mahayutiमहायुती