शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शिवरायांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन राज ठाकरेंनी सांगितली ED नोटीस अन् त्यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:18 IST

Raj Thackeray Speech In MNS Melava: हा पांढरा हत्ती आहे आपल्याला झेपायचं नाही म्हणून माझ्यासोबत काही पार्टनर यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला.

Raj Thackeray Speech In MNS Melava: राज ठाकरे वारंवार भूमिका बदलतात असा आरोप काही माध्यमातून जाणीवपूर्वक पसरवला जातो. काही पत्रकार राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले असून ते न्यूज चॅनेल, वृत्तपत्रातून काही गोष्टी छापून आणतात. माझ्याबद्दल काय पसरवलं जातंय की मी मोदींना पाठींबा दिला, पुढे विरोध केला आणि माझ्यामागे ईडी लावली म्हणून पुन्हा मोदींना पाठींबा दिला. त्या ईडी प्रकरणावर आज मी बोलणार आहे. महाराजांची शपथ घेऊन सांगतो जे सांगतोय ते खरं आहे असं सांगत राज ठाकरेंनी ईडी नोटिशीवर पहिल्यांदा खुलासा केला. 

मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, व्यवसाय करणे हे पाप तर नाही ना..? अनेकांना व्यवसाय दाखवता येत नाही पण त्यांचं सुरू असते. २००५ साली वर्तमान पत्रात मी बातमी वाचली. त्यात केंद्र सरकारच्या एनटीएससीच्या मिल्स विकून कामगारांचे पगार देऊन टाका असं सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यात एक कोहिनूर मिल होती. ती बातमी वाचता वाचता मी पार्टनरशी चर्चा केली. एका सहकाऱ्याला बोलावून चर्चा केली. सगळ्यांनी चर्चा करून टेंडर भरून टाकले. एकेदिवशी माझ्या पार्टनरचा घाबरत घाबरत फोन आला आणि टेंडर लागले असं सांगितले. ४००-५०० कोटींचे टेंडर इतका पैसा आणायचा कुठून तेव्हा माझीही पायाखालची जमीन सरकली असं त्यांनी सांगितले.

त्यानंतर आमच्या एका पार्टनरने आयएल अँड एफएस कंपनीशी बोलणे केले. ही कंपनी आम्ही पैसे भरायला तयार आहोत असं बोलले. त्यानंतर ते सगळे पैसे त्या कंपनीने भरले. आम्ही त्यात ७-८ पार्टनर होतो. त्यानंतर पुन्हा कोर्ट प्रकरण सुरू झाले. वर्ष- दीड वर्ष त्यात गेले. त्या दरम्यान हा पांढरा हत्ती आहे आपल्याला झेपायचं नाही म्हणून माझ्यासोबत काही पार्टनरने यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. २००८ साली आमचा हिस्सा विकून आम्ही बाहेर काढू. त्यानंतर हे प्रकरण संपले असं राज ठाकरे म्हणाले. 

दरम्यान, पुढे जेव्हा मला ईडीची नोटीस आली, मला कळलं नाही की नक्की काय घडलं, त्यात कोहिनूरचा विषय होता. याच्याशी आपला संबंध काय, मला बोलवले तेव्हा ती माणसं काय बोलत होती हेच मला समजेना. जे पैसे आम्हाला मिळाले त्यावर आम्ही टॅक्स भरून विषय संपला होता. आम्ही बाहेर पडलो मग इतक्या वर्षांनी नोटिस आली तेव्हा सीएला बोलावलं. तेव्हा आमच्यातील एका पार्टनरने टॅक्सचे पैसे भरलेच नाही हे पैसे बाहेरच्या बाहेर वापरले हे समोर आले. मग त्यानंतर कटकट नको म्हणून पुन्हा आम्ही आपापला टॅक्स भरला. राज ठाकरेचे व्यवहार इतके स्वच्छ असतात, तो ईडीला घाबरेल? असं राज यांनी सांगितले. 

डोक्यावर तलवार घेऊन फिरत नाही

एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि त्यांची स्तुती करायला लागला...मला त्याच्याशी काय देणे घेणे. माझ्या डोक्यावर तलवार घेऊन मी फिरत नाही. बाकींच्यासारखे नाही. ४ दिवस आधी म्हणाले होते ७०,००० कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना जेलमध्ये टाकू, त्यानंतर मोदींनी त्यांना जेलच्या ऐवजी डायरेक्ट मंत्री मंडळात घेतलं. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे पहिल्यांदा कळले असा खोचक टोला राज यांनी भाजपाला लगावला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई