शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

...जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात दुष्काळ संपला असता - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 19:48 IST

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

पुणे : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षांचे नेते इथे बसलेत. पानी फाऊंडेशनच्या कामामुळे जर जलसंधारणचं काम होऊ शकतं तर इतक्या वर्षाचा जलसंधारणाचा पैसा गेला कुठे ?असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार,  जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्तिथ होते.

(पाण्यासाठी सगळ्यांचा एकच पक्ष - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

(काहीजण बोलघेवड्या सारखं बोलतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला)

गावातल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमिर खान करत असेल तर सरकार काय करतं असेही राज ठाकरे म्हणाले. राज यांनी आपल्या मनोगतात चौफेर टीका केली. राज म्हणाले, जलसंधारणामध्ये जेवढं पाणी मुरलं तेवढ्यात राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. पानी फाऊंडेशन मध्ये सरकारी अधिकारी काम करतात तर, सरकारच्या कामात सरकारी अधिकारी काम का करत नाहीत? आमिर खान कधी कुठला पुरस्कार घेत नाही. मात्र मॅगसेस पुरस्कार मिळेल तेव्हा तो नक्की घेईल. प्रेक्षकांनी तुम्ही श्रमदानासाठी कधी येणार असा प्रश्न केला असता श्रमदानासाठी नक्की येईल सरकार मध्ये नसल्याने मला फावडं कसं चालवायचं हे माहित नाही तेवढं नक्की शिकवा.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणे