शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे म्हणजे 'कटी पतंग', भाजपाचा बोचरा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 22:15 IST

राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. आता भाजपानेही त्यांना प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

ठळक मुद्देराज ठाकरे म्हणजे एक कटी पतंग आहे, असा बोचरा टोला भाजपाने लगावलाराज ठाकरेंकडे असलेले सगळे मुद्दे वापरून संपले आहेत तरीही बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच आहे, असे भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले

मुंबई - राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचे व्यंगचित्र राज यांनी रेखाटले होते. आता भाजपानेही त्याला प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला लगावला आहे. राज ठाकरे म्हणजे एक कटी पतंग आहे, असा बोचरा टोला भाजपाने लगावला आहे.  राज ठाकरेंकडे असलेले सगळे मुद्दे वापरून संपले आहेत. तरीही बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच आहे, असे भाजपाने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात म्हटले आहे. राज ठाकरे 'राज: एक कटी पतंग' असा उल्लेख असलेला पतंग उडवत आहेत आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचे तुटलेले पतंग खाली पडले आहेत. तसेच शरद पवार आणि काही नमोरुग्ण त्यांना प्रोत्साहन देत आहेत, असे या व्यंगचित्रात दाखवले आहे. 

दरम्यान,  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यंगचित्रातून लक्ष्य केले होते. पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटले होते. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत आहेत. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा