शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंची टीका भाजपाला झोंबली, पोलिसात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 23:37 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर चौफेर टीका केली होती. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून, भाजपाकडून राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सांगली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर चौफेर टीका केली होती. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून, भाजपाकडून राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी सांगली येथील पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे.  भाजपा समाजात तेढ वाढवत असून, 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपाकडून जातीय दंगली घडवल्या जातील, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या भाषणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  राज ठाकरे यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना आणि सरकारकडे द्यावेत, असे केळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी ही तक्रार स्वीकारली आहे.  यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यासमोर मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे . यावेळी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, उषा गायकवाड, धनपाल खोत, श्रीकांत वाघमोडे, दरीबा बंडगर, दीपक माने, योगेश जाधव, श्रीकांत शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती.  देशातील आणि राज्यातील भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकांना सांगण्यासारखे यांच्याकडे काही उरले नाही. त्यामुळे २०१९ साली निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम धार्मिक दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रश्नावर सुनावणी सुरू आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही सुनावणी पुढे सरकेल, याची व्यवस्था भाजपाकडून केली जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर बरोबर हे घडेल. राम मंदिराचा विषय घडला की, ताबडतोब दंगली घडवा, अशी चर्चादेखील या मंडळींनी काही मुस्लीम संघटनांशी केल्याचा गंभीर आरोप, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला होता.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाNeeta Kelkarनीता केळकरPoliticsराजकारण