शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

'भारतरत्न'साठी लालकृष्ण अडवाणींचं राज ठाकरेंकडून अभिनंदन, पण भाजपाला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 2:09 PM

देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं

मुंबई - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लालकृष्ण अडवाणींनाभारतरत्न दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत केंद्र सरकारचेही आभार मानलेत. परंतु अडवाणींना पुरस्कार याआधीच मिळायला हवा होता असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला खोचक टोला लगावला. 

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं की, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजपा आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा होता. अर्थात हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असो असं त्यांनी म्हटलं. 

तसेच करोडो भारतीयांचं आणि अनेक पिढ्यांचं, राममंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, त्यात मोलाचा वाटा हा अडवाणीजींचाच, आणि हे करताना त्यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावली. राजकीय अस्पृश्यता आणि उपेक्षा सहन केली. रथयात्रेतून अडवाणींनी देशातील हिंदूंची अस्मिता जागृत केली आणि भारतीय जनता पक्षाचा उदय झाला, पण हे करताना 'अब की बारी अटलबिहारी' म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा हा अडवाणींकडे होता. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आजपर्यंतच राजकारण पाहिलेले आणि देशातील राजकारणाला वळण देणाऱ्या ह्या ज्येष्ठ नेत्याचं ह्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. 

अतिशय योग्य निवड!"भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी या दोन व्यक्तींची झालेली निवड अतिशय योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील दुबळ्या वर्गासाठी काम केलं. १९७८ साली मी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेकदा आमची चर्चा होत असत. अतिशय साधे आणि विनम्र, मात्र विचाराबाबत अत्यंत भक्कम असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांची निवड ही योग्यच आहे. दुसरीकडे, लालकृष्ण अडवाणी हे अनेक वर्ष देशाच्या संसदेत होते. ते दिल्लीतून निवडूनही गेले होते. एखादा-दुसरा अपवाद सोडला तर त्यांचा कधी पराभव झाला नाही. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता," अशा शब्दांत शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाBharat Ratnaभारतरत्न