शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज यांच्या व्यंगचित्रात अवतरले शिवराय; म्हणाले, 'जातीपातीच्या चिखलातून बाहेर या!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 18:20 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.  

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र फेसबुक अकाऊंटवर शेअर केलं आहे.  काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपण हा बॅकलॉग नक्की भरून काढू असा शब्द दिला होता. त्याप्रमाणेच राज ठाकरे एका पाठोपाठ एक व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करून आपल्या अंदाजाने टीका करत आहेत. 

शनिवारी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी जातीपातीच्या राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मदतीला घेऊन महाराष्ट्राच्या जनतेची कान उघाडणी केली आहे. त्यांनी यामध्ये बिन चेहऱ्याचे जातीपातीचे नेते दाखवले आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगवेगळ्या जातीच्या लोकांशी संवाद साधत असल्याचं म्हटलं आहे. 

'अरे, तुम्हासर्वांना बरोबर घेऊन मी मुघलांशी लढलो! आणि आज तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढताय!का? तर त्या जातीयवादी स्वार्थी नेत्यांसाठी! या रे माझ्या लेकरांनो त्या चिखलातून बाहेर या! असं या व्यंगचित्राच नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्र रेखाटलं होतं.२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली. व्यंगचित्रामधून  शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे.  

 युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. त्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलं. " महाराष्ट्र सरकार (मधील एक) सादर करत आहे. (किती अंकी  महित नाही.  "परत सांगतो सोडून जाईन!" अशा आशयाचे शीर्षक राज यांनी या व्यंगचित्राला दिलं.   

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे