राज ठाकरे दौ:यावर
By Admin | Updated: October 31, 2014 01:38 IST2014-10-31T01:38:36+5:302014-10-31T01:38:36+5:30
निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बॅकफूटवर गेलेले मनसेप्रमुख राज ठाकरे कामाला लागले आहेत.

राज ठाकरे दौ:यावर
मुंबई : निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर बॅकफूटवर गेलेले मनसेप्रमुख राज ठाकरे कामाला लागले आहेत. लोकसभा आणि विधानसभेतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर सलग 17 दिवसांच्या दौ:यात राज ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका:यांच्या भेटी घेणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील जाधव कुटुंबाच्या भेटीने राज आपल्या दौ:याची सुरुवात करणार आहेत. 1 नोव्हेंबर रोजी जवखेडेत जाधव कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राज 2 तारखेला कल्याण-डोंबिवलीला पोहोचतील. 3, 4 आणि 5 नोव्हेंबरदरम्यान कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्ते व पदाधिका:यांची भेट घेतील. प्रत्येकाला भेटून निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेत पराभवाची कारणमीमांसा करतील. त्यानंतर 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान राज नाशिक जिल्ह्याच्या दौ:यावर जातील. नाशिकनंतर औरंगाबाद व पुणो जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड दौ:यानंतर 17 तारखेला राज मुंबईकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)
‘कृष्णकुंज’वर येऊ नका!
राज ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी काही कार्यकत्र्यानी
1 नोव्हेंबर रोजी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल होण्याची तयारी चालविली होती. या कार्यकत्र्याना राज यांनी कृष्णकुंजवर न येण्याचे आवाहन केले आहे. दौ:यामुळे तुमची भेट घेता येणार नाही, असे राज यांनी म्हटले आहे.