शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस मार्गदर्शक तत्त्वांची जागृती करा, परिवहन विभागाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 04:21 IST

स्कूल बससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांबाबत शाळांबरोबरच बस मालकही अनभिज्ञ असल्याने, त्यांच्यामध्ये या मागदर्शक तत्त्वांबाबत जागृती निर्माण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. याशिवाय राज्यात किती स्कूल बस धावतात, याचीही विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.

मुंबई : स्कूल बससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांबाबत शाळांबरोबरच बस मालकही अनभिज्ञ असल्याने, त्यांच्यामध्ये या मागदर्शक तत्त्वांबाबत जागृती निर्माण करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमवारी दिले. याशिवाय राज्यात किती स्कूल बस धावतात, याचीही विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.केंद्रीय मोटर वाहन कायद्याचे नियम धाब्यावर बसवून राज्यात स्कूल बसेस चालविण्यात येतात. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड करून या बसेस रस्त्यावरून चालतात. शाळा व स्कूल बसेस मालकांमध्ये ‘कॉमन स्टँडर्ट अ‍ॅग्रीमेंट’ (सीएसए) करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या कायद्याचे पालन करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका पालक-शिक्षक संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या खंडपीठापुढे होती.स्कूल बसेससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांची माहिती शाळेबरोबरच बसेस मालकांनाही नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. याशिवाय केंद्राच्या कायद्यामध्ये जी स्कूल बसची व्याख्या करण्यात आली आहे, ती व्याख्याच राज्य सरकारने मोडीत काढली आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, स्कूल बस १२ आसनी व आणखी एक अतिरिक्त आसन असणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकार त्याहीपेक्षा कमी आसनी वाहनांना ‘स्कूल बस’चा दर्जा देत आहे, असेही याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर न्यायालयाने शाळा व स्कूल बसेस मालकांमध्ये स्कूल बससंदर्भातील मागदर्शक तत्त्वांबाबत जागृती करण्याचे निर्देश परिवहन विभागाला दिले, तसेच राज्यामध्ये किती व कोणत्या प्रकारच्या स्कूल बसेस चालतात, याची माहिती २ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMumbai High Courtमुंबई हायकोर्ट