शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:58 IST

तीस वर्षांच्या अभ्यासावरून पुढच्या तीस वर्षांचे अनुमान; हवामान बदल, तापमानवाढीचा फटका

- सचिन लुंगसे/निशांत वानखेडेमुंबई/नागपूर : हवामान बदल, जागतिक तापमानवाढीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? १९९० पासूनच्या अभ्यासावरून सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने अनुमान काढले आहे. यात राज्यातील तापमान पुढच्या तीस वर्षांत १ ते २ डिग्रीने वाढले. तर प्रदूषण असेच राहिले तर सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील.इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) साठी भारतीय हवामान खात्याच्या मदतीने या संस्थेने पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्राचा अभ्यास केला असून पावसाचे दिवस वाढल्याचा फायदा दुष्काळी जिल्ह्यांना होईल. अधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र अतिवृष्टीचे संकट येईल.प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.साधारण परिस्थितीत १ अंशापेक्षा अधिक तापमानवाढीचे जिल्हेभंडारा २.० । अकोला १.३ । अमरावती १.६ । औरंगाबाद १.१ । बीड १.२। बुलडाणा १.४ । धुळे १.१ । गोंदिया १.१ । हिंगोली १.२ । जळगाव १.३ । लातूर १.४ । नागपूर १.१ । नंदुरबार १.६ । उस्मानाबाद १.४ । वर्धा १.१ । वाशिम १.२ । यवतमाळ १.१प्रदूषणामुळे तापमानवाढीचा गंभीर धोकाप्रदूषणाला आळा घातला तर महाराष्ट्रात पुढील तीस वर्षांत साधारणपणे १ ते २ डिग्री अंश सेल्सिअस इतके तापमान वाढेल. परंतु, तो आळा घालण्यात अपयश आले तर मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा दुपटीने वाढ होईल. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढलेले असेल. या वाढीचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामांवर होणार आहे. आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही. परंतु वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, लहान बंधारे, तळे इत्यादी जलसाठे वाढविणे, निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे अशा अनेक प्रयत्नांनंतरच हवामान बदल रोखला जाऊ शकतो. त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला त्याचा अभ्यास करावा, कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करावी, असा उपाय सुचविण्यात आला आहे.पावसाचे दिवस वाढले तर दुष्काळी जिल्ह्यांना फायदाकार्बन उत्सर्जन व प्रदूषण असेच राहिले तर महाराष्ट्रातील राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ८ दिवस वाढतील.वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ८, मुंबई उपनगरात ७, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, जालना व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ६, अकाेला, बुलडाणा, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ५ दिवस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमधध्ये २ ते ४ दिवस अशी ही वाढ राहील.प्रदूषणाला आळा घातला गेला तर मात्र यवतमाळ वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ९ दिवस वाढतील.पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सरासरी गाेंदियात किमान १ टक्का तर पुण्यात कमाल २९ टक्क्यांनी वाढेल. प्रदूषण वाढले तर मात्र गाेंदियाची सरासरी ३ तर पुण्याची ३४ टक्क्यांनी वाढेल.