शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:41 IST

Maharashtra Lightning News: राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  वीज पडून दोन सख्ख्या भावांसह चारजणांचा मृत्यू झाला असून  ७ जण भाजले आहेत.

यश राजू काकडे (वय १४), रोहित राजू काकडे (२१, रा. सारोळा), रंजना बापूराव शिंदे (५०, रा. मोंढा बु.) व शिवराज सतीश गव्हाणे (३१, रा. पिंपळदरी) अशी मयतांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे (४७) यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी नथ्थू हरचंद सनेर (६३) तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) व शांताराम शंकर कठोरे (४४, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला.  तुरखेड (जि. अमरावती)येथील पवन  कोल्हे (२५) हा मरण पावला.

राजापुरात ढगफुटीसदृश पाऊसराजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यात शुक्रवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला असून, तालुक्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील श्रीदेवी महाकाली मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. तब्बल ३७ वर्षांनंतर मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

रत्नागिरीला रेड अलर्ट; मुंबईला यलो अलर्टमुंबई : मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे. पावसाचा हा ट्रेंड असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून आणि मुंबईला येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम आहे.

४० वर्षांत प्रथमच जूनमध्येच भरले सीना धरणसीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.  गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी जूनमध्येच धरण भरले आहे. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. २.४० टीएमसी क्षमता असलेल्या सीना धरणातून दुपारी १२ वाजता २२० क्युसेक वेगाने नदी पात्रात विसर्ग सोडल्याची माहिती सीना धरणाचे सहायक अभियंता संभाजी पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायी ठरणारे सीना धरण भरल्याने शेतकरी सुखावला आहे.   

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र