शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

मुंबईत जोर'धार' पाऊस ! केईएम रुग्णालयात साचलं पावसाचं पाणी, रुग्णसेवेला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:21 IST

मुंबई, दि.  29 - मुंबई शहरात 24 तासांत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहेत. शिवाय, पुढील 24 तासांत ...

मुंबई, दि.  29 - मुंबई शहरात 24 तासांत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहेत. शिवाय, पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचले आहे.   घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज मंदावला आहे.  पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.  शिवाय, महापालिकेच्या सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

पावसामुळे मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. खबरदारी म्हणून पुण्याहून NDRF च्या दोन तुकड्या मुंबईकडे रवाना करण्यात आल्या आहेत. परळ येथील केईएम रुग्णालयातही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे हॉस्पिटल प्रशासनासहीत रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर पाणी साचल्याने जवळपास 30 रुग्णांना वरील  मजल्यावर हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. जोगेश्वरी, चर्चगेट जंक्शन आणि सात रस्ता येथे झाड पडल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. दादर टीटीजवळ पाणी साचल्याने वाहूतक कोंडी झाली आहे. वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं असून सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. 

हायवेंवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा परिणाम रेल्वेवरही झाला असून नेहमी उशिरा धावणारी मध्य रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत असून ठप्प झाल्याचीच परिस्थिती आहे. तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वांद्रे स्थानकात रोखण्यात आली आहे. हार्बर रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली असून वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेक स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने त्यांनाही नद्याचं स्वरुप आलं आहे. नेहमी गर्दी असणारं सीएसटी स्थानक तर ओस पडलं आहे.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार