कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:33 AM2022-04-27T06:33:21+5:302022-04-27T06:34:05+5:30

गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस पडला.

Rain with thunder in Konkan, Central Maharashtra, Marathwada | कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

googlenewsNext

मुंबई :  पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोव्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मुंबईत उन्हाचा जोर कायम असून, गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत ३५, तर सांताक्रूझमध्ये ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

२७ आणि २८ एप्रिल रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rain with thunder in Konkan, Central Maharashtra, Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस