शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 08:45 IST

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची आणि लोकांची तारांबळ उडाली आहे.

लोणावळा : दोन दिवसांपासून ढगाळलेल्या वातावरणानंतर शुक्रवारी पहाटेपासून लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे दोन दिवसांपासून वातावरण ढगाळ झाले असून ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी बरसायला लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात लोणावळ्यातील तापमानाचा पारा 34 ते 35 अंशापर्यंत पोहोचला होता. मात्र, पावसामुळे तापमान अचानक कमी झाल्याने दिवसादेखील थंडी वाजायला लागली आहे. आजदेखील सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरींची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांची आणि लोकांची तारांबळ उडाली आहे. तत्पूर्वी गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्याचे दर्शनही झाले नव्हते. आजदेखील पाऊस पडायला सुरू झाल्याने तिच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, पावसामुळे विटभट्टीधारकांचे देखिल नुकसान होणार आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा  निर्माण झाला असून उत्तर मध्य-महाराष्ट्रावराही चक्रवाती परिस्थिती कार्यरत आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि कोकण तसंच गोवा येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच बहुतांश ठिकाणी हवामान ढगाळ राहील. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे, ज्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी