राज्यभरात पाऊस मुक्कामी
By Admin | Updated: September 15, 2015 01:59 IST2015-09-15T01:59:46+5:302015-09-15T01:59:46+5:30
पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैॠत्य मोसमी पावसाचा

राज्यभरात पाऊस मुक्कामी
पुणे : पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैॠत्य मोसमी पावसाचा परतीच्या प्रवासाने अद्यापही राजस्थान, पंजाब, हरियाणाच्या काही भागात मुक्काम ठोकलेला आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत राज्यात ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस पडला.
गेल्या २४ तासांत कोकणात जव्हार येथे ४० मिमी, कणकवली, महाड, मालवण, मुंबई (कुलाबा), मुंबई (साांताक्रूझ), मुरबाड, पालघर, पोलादपूर, पाली, ठाणे २ ० मिमी, चिपळूण, खेड, माणगाव, म्हापसा, रोहा, संगमेश्वर-देवरुख, येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर मध्य महाराष्ट्र येवला येथे ४० मिमी, मंगळवेढा, पारनेर, शहादा येथे प्रत्येकी ३० मिमी, बारामती, भोर, धडगाव / गिधाडे, गगनबावडा, महाबळेश्वर, नांदरुबार, ओझरखेडा, फलटण, पुरंदर-सासवड, सोलापूर येथे प्रत्येकी २० मिमी, दहिवडी, दौंड, एरंडोल, हरसूल, खटाव-वडूज, कोरेगाव, माळशिरस, शिरूर, सुरगणा, वेल्हे येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
मराठवाड्यात ननलांगा ३० मिमी, घनसावंगी, हादगाव, कळमनुरी, कंधार येथे प्रत्येकी २० मिमी, देगलूर, गंगाखेड, लोहारा, मुखेड, नांदेड, पालम, परांडा, सोयेगाव येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडला आहे.
विदर्भात गोंडपिपरी येथे ५० मिमी, पांढरकवडा, उमरखेड येथे प्रत्येकी ४० मिमी, दिग्रस, काटोल, कोपरणा, मानोरा, वणी, झरीझामनी येथे प्रत्येकी ३० मिमी, दारव्हा, जोईती, महागाव, मारेगाव, समुद्रपूर, यवतमाळ येथे प्रत्येकी २० मिमी, अमरावती, आष्टी, भद्रावती, धामणगाव, हिंगणघाट, मोर्शी, पोम्भूर्णा, सेल ू वर्धा, वरोरा येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. भिरा येथे ९० मिमी, डुगांरवाडी येथे ६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
पुढील ४८ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.