शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Rain in Cold Wave: उन पाऊस नाही, आता थंडी पाऊस! महाराष्ट्राच्या मोठ्या भागात पाऊस पडणार; वाढविली धाकधुक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:24 IST

मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर आले आहे. दोन महिने उशिराने का होईना लोकांना थंडी अनुभवता आली होती.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पारा उतरला होता. यामुळे दोन महिने उशिराने का होईना लोकांना थंडी अनुभवता आली होती. परंतू, आता याच थंडीत पाऊसही अनुभवावा लागणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात पुढील दोन दिवसांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत प्रणालीमुळे (Trough) पुढील २ दिवसांत दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर आले आहे. विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचे किमान तापमान १८ अंश एवढे असल्याने मुंबईकरांना सध्या माथेरानपेक्षाही अधिक थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचा किमान तापमानाचा पारा १५ अंशाखाली नोंदविण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतानाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक आहे. हा प्रभाव उत्तर भारतातून राजस्थान, गुजरातमार्गे कोकणात उतरत आहे.

थंडी वाढणार खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावलेले आहे. येथेही काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढू शकते.

अपेक्षित थंडी नाही उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असून, अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरी येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र