शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमधील किळसवाणा प्रकार, बटाटे पायांनी तुडवतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 14:41 IST

हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये घडलेला अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

मुंबई- हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये घडलेला अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पेन्ट्रीकारमध्ये जिथे प्रवाशांसाठी जेवण बनवलं जातं तिथे पायाने बटाटे तुडविले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमध्ये प्रवाशांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकळलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२८३३) ही रेल्वेगाडी अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे स्टेशनवर आली असता पेन्ट्रीकारमध्ये ठेकेदाराचा कर्मचारी चक्क पायानी उकळलेले बटाटे तुडवीत असल्याचे आढळून आलं. 

या व्हिडीओमध्ये हा कर्मचारी जेवण बनविण्यासाठी वापरले जाणारे बटाटे पायाने तुडवताना स्पष्टपणे दिसत आहे. बटाटे पायाने तुडवितानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने रेल्वेतील अन्न खाण्यासाठी किती सुरक्षित यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. एकीकडे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवत असल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे मात्र खाद्य पदार्थ पुरविण्यासारख्या आवश्यक गोष्टींकडे अशाप्रकारे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. 

शहराच्या रेल्वेस्थानकावर दररोज ३ वाजून २५ मिनिटांनी येणारी अहमदाबाद एक्सप्रेस ८ फेब्रुवारी रोजी ४ तास उशिरा आल्याने ७:३० वाजता रेल्वे फलाटावर आली. धामणगाव रेल्वे स्थानकचे अधीक्षक कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार पुलगाव व तळणी रेल्वेमार्गाच्या मध्ये रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन तासाचा ब्लॉक ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्वच गाड्या स्थानकावर उशिरा पोहचत होत्या.

मंगेश भुजबळ, पवन शर्मा हे नातेवाईकांना घेण्याकरिता रेल्वे स्थानकावर गेले असता पवन शर्मा व इतरांना  पॅन्ट्री  कोचमध्ये प्रवाशांच्या भोजनासाठी वापरात येणारी बटाटे अक्षरश: पायांनी तुडवताना बघितले. सर्व पाहत असताना त्यांनी स्वत:च्या मोबाईल फोनवर व्हिडीओ घेऊन हा प्रकार कैद केला. सदर प्रकार प्रवाशांच्या जीविताशी व आरोग्यासाठी हानिकारक असल्याने त्या विषयाची तक्रार केली आहे. असा प्रकार पुढे होऊ नये याची काळजी घेणे ही रेल्वे प्रशासनाची जवाबदारी आहे. तशी तक्रार रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.