रायगड जिल्ह्यास पावसाने झोडपले, भातपिके अडचणीत

By Admin | Updated: August 1, 2016 16:35 IST2016-08-01T16:25:24+5:302016-08-01T16:35:26+5:30

संततधार पावसामूळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा,सावित्री,पाताळगंगा अल्हास आणि गाढी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ झाली

Raigad district rains, rain fall in distress | रायगड जिल्ह्यास पावसाने झोडपले, भातपिके अडचणीत

रायगड जिल्ह्यास पावसाने झोडपले, भातपिके अडचणीत

>24 तासात 2528 मिमी पाऊस,  कजर्त येथे सर्वाधिक 290 मिमी पावसाची नोंद
जयंत धुळप / दि.1 (अलिबाग)
रायगड जिल्ह्यात गेल्या चोविस तासात पावसाने अगदी झोडपून काढले आहे. संततधार पावसामूळे जिल्ह्यातील प्रमुख कुंडलिका, अंबा,सावित्री,पाताळगंगा अल्हास आणि गाढी या नद्यांच्या पातळीत विक्रमी वाढ होवून नद्याची पातळी पूररेषेकडे झेपाऊ लागली असल्याने जिल्ह्यात सर्वत्र सतर्कतेचा ईशार देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीत पावसाचे पाणी भातरोपांच्या वर गेले असल्याने भातपिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोविस तासात जिल्ह्यात एकुण 2528.20 मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक 290 मिमी पावसाची नोंद कजर्त येथे झाली आहे. जिल्ह्यात उवर्रित ठिका़णी रोहा-220  मि.मि.,  पनवेल -193मि.मि., म्हसळा-192 मि.मि., मुरु ड-189 मि.मि., माथेरान-170.मि.मी, तळा-168मिमी.  सुधागड पाली-158 मि.मि., पेण-155 मि.मि., श्रीवर्धन-145मि.मि., खालापूर-136 मि.मि.,पोलादपूर-123 मि.मि., महाड-122मि.मि., माणगांव-115 मि.मि., अलिबाग-94 मि.मि.  उरण-58 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. हे सरासरी पजर्न्यमान 67.75 मि.मि. आहे.
जिल्ह्यातील 70 टक्के पजर्न्यमान पूर्ण
यंदाचे सोमवारचे हे सरासरी पजर्न्यमान जिल्ह्यात 158 मिमी आहे, गतवर्षी याच दिवशी जिल्ह्याचे सरासरी पजर्न्यमान केवळ 10.84 होते. जिल्ह्यातील वार्षीक एकुण अपेक्षीत सर्वसाधारण 50 हजार 282 मिमी पावसापैकी सोमवारी सकाळी आठ वाजता 70 टक्के म्हणजे 34 हजार 933 मिमी पाऊस पूर्ण झाला आहे.
 
जिल्ह्यातील नद्यांची पातळीत झेपावू लागली पूररेषेकडे
संततधार पावसामूळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदि क्षेत्रतील कोलाड  येथे चोविस तासात 205 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी डोळवहाळ येथे 23.35 मिटर झाली आहे. कुंडलिका नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 23.95 मिटर असल्याने नदि किनारच्या परिसरात सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.उल्हास नदि क्षेत्रतील  कर्जत येथे चोविस तासात 290 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी कर्जत येथे 44.60 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 48.77 मिटर आहे.
पाताळगंगा नदि क्षेत्रतील खालापूर  येथे चोविस तासात 136 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी लोहप येथे 19.02 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 21.52 मिटर आहे. अंबा नदि क्षेत्रतील  सुधागड  येथे चोविस तासात 158 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी नागोठणे येथे 7.35 मिटरला पोहोचली आहे. अंबा नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 9 मिटर आहे. सावित्री नदि क्षेत्रतील  महाड  येथे चोविस तासात 122 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी महाड येथे 4.20 मिटरला पोहोचली आहे. सावित्री नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 6.50 मिटर आहे. गाढी नदि क्षेत्रतील पनवेल  येथे चोविस तासात 193 मिमी पाऊस झाला असून नदीची जलपातळी पनवेल येथे 2.90 मिटरला पोहोचली असून नदिची प्रत्यक्ष पूर पातळी 6.55 मिटर आहे.
 
72 तासांकरीता अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभागाने वतर्विलेल्या अंदाजा नुसार येत्या 72 तासात जिल्ह्यात अति व तिव्र स्वरुपाच्या पजर्न्यवृष्टीची शक्यता असून, या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे तसेच पावसाच्या निमीत्ताने कोणतीही समस्या आल्यास आपल्या तालुक्यांच्या वा जिल्ह्याच्या आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सुत्रंनी केले आहे.

Web Title: Raigad district rains, rain fall in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.