शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

...तर राहुलच्या पंतप्रधान पदाला विरोध नाही - राष्ट्रवादी काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:47 AM

देशाच्या पंतप्रधान पदासाठी जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संधी दिल्यास त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगितले आहे.

मुंबई - देशाच्या पंतप्रधान पदासाठी जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संधी दिल्यास त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपण स्वत: पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे त्या पदासाठी आम्ही कधीही दावेदार राहणार नाही, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी स्पष्ट केले.कर्नाटक प्रचारात व्यस्त असणाऱ्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाची उमेदवारी स्वीकारण्याबाबतचे वृत्त झळकताच उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास आपण पंतप्रधान पद स्वीकारू, असे राहुल यांनी म्हटले. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार माजिद मेमन यांनी हरकत घेत शरद पवार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असल्याचा दावा केला. भाजप विरोधातील आघाडीसाठी काँग्रेस पूर्वअट घालू शकत नाही, असेही मेमन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. त्यांच्या विधानानंतर राहुल यांच्या पंतप्रधान पदाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याची चर्चा सुरू झाल्याने प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.तत्पूर्वी, मेमन यांनी पवार हेच पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले होते. सुरुवातील बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस आघाडीची चर्चा होती. परंतु, पवार यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपाविरोधात विरोधकांच्या एकजुटीचे प्रयत्न सुरू झाले आणि राहुल यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजप विरोधातील आघाडी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करेल, असे वाटत नसल्याचे मेमन म्हणाले. राहुल गांधींसह ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू अशा अनेक नेत्यांनापंतप्रधान पदाची स्वप्ने पडत असली तरी पवार हेच योग्य उमेदवार असल्याचा दावा मेमन यांनी केला होता.सत्ताबदल निश्चितराहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याचे विधान केले असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे मलिक म्हणाले. स्वत: पवार यांनी वारंवार हे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान पदावर आमची दावेदारी राहणार नाही. देशातील परिस्थिती पाहाता सत्ताबदल निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणाºया निकालानुसार त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNCPराष्ट्रवादी काँग्रेस