शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या आधीच राहुल नार्वेकर आजारी? संजय राऊत म्हणाले, हा सुद्धा भूकंप आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 12:48 IST

Sanjay Raut on Rahul Narvekar Health latest news: धुळे दौऱ्यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते.

जानेवारीमध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर बोलताना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बावनकुळे हे स्वत:पासून बोलत आहेत. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. 10 तारीख हा निकालाचा दिवस आहे आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे, अशा शब्दांत समाचार घेतला आहे. 

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीवर बोलताना राऊत म्हणाले की, माझ्या प्रतिउत्तराला उत्तर देण्या इतके ते मोठे नाहीत, ते मुख्यमंत्री जरूर आहेत. यांना जो निधी मिळाला तो आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी मिळाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आमदारांचे 50 कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी 100 कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळाला आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. धुळे दौऱ्यावर असताना राऊत पत्रकारांशी आज बोलत होते.

राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये, नाहीतर तुमचा निधी घोटाळा आम्हाला उघडा करावा लागेल. मुंबई महानगरपालिकेची 90 हजार कोटींची तिजोरी कोणी लुटली असा देखील प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील 14 महानगरपालिका निवडणुका तुम्ही पराभवाच्या भीतीने घेत नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी तुमच्याकडे चिन्ह असलेली शिवसेना आहे तर मग निवडणुका का घेत नाहीत, असा प्रश्न भाजप समोर उपस्थित केला आहे.

पंतप्रधान, मंत्र्यांना प्रचारावर बंदी घालावी...घोषणा आश्वासन आणि प्रचार ही पंतप्रधानांची त्रिसूत्री असून त्यांनी शपथ घेतल्यापासून दहा वर्षात त्यांनी फक्त प्रचारच केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी लावला आहे. तसेच निवडणुकीच्या तीन महिने आधी पंतप्रधान आणि मंत्र्यांना प्रचारासाठी बंदी घातली पाहिजे, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि त्यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात मागणी देखील केलेली होती. राज्य सरकारचा पैसा ही मंडळी प्रचार करण्यासाठी वापरत असल्याने हा सर्व खर्च त्यांच्या पक्षाकडून वसूल करण्यात यावा, अशी देवी देखील भूमिका आमची असणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष